ज्यभरात सी एस सी सक्रीय करण्यासाठी ४ सर्व्हिस सेंटर एजन्सीज(एस सी ए) नियुक्त करत महाराष्ट्र राज्याने सप्टेंबर २००८ पासून सी एस सी चा मलबजावणीला प्रारंभ केला. महसूल विभागाच्या ९६ सेवांसह भूमी अभिलेख शिधापत्रिका तसेच सेवायोजन कार्यालय सेवा अशा विविध जी टू सी ( G2C) ( गव्हर्नमेंट टू सिटीजन ) सेवा सी एस सी मार्फत नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी सेतु महाराष्ट्र या राज्य नियुक्त संस्थेने काही पावले उचलली आहेत. महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जात आहेत. केंद्रचालक नागरिकाला आवश्यक असणाऱ्या सेवेचा अर्ज ऑनलाईन भरून देतो आणि नागरिक आवश्यक त्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्राप्त करू शकतात. रहिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशी अनेक उपयुक्त कागदपत्रे या महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिक प्राप्त करीत आहेत. यासाठी त्यांना लांबच लांब रांगा लावायची गरज नाही आणि प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात असंख्य फेऱ्याही माराव्या लागत नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेचीही बचत करते. काही कालावधीने नागरीकांना ऑनलाईन पध्दतीची सेवा ही जलद मिळत गेली त्यामुळे महा ई सेवा केंद्राला भव्य स्वरुप प्राप्त झाले. महा ई सेवाकेंद्राला पुढे सार्वजनिक सुविधा केंद्र म्हणजेच या नावाने राष्ट्रीय स्थराव अस्थीत्व लाभले व याव्दारे राज्यस्तरीय सेवान सोबतच राष्ट्रीय स्तरावरील सेवा देखील आता दिल्या जाऊ लागल्या आपल्या कारंजा नगरातील बनारसे महा ई सेवाकेंद्र हे पहीले महा ई सेवा केंद्र म्हणुन सुरु झाले दि. २६ जानेवारी, २०१० रोजी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
No reviews yet. Be the first to add a review.